पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामध्ये पिंपळकोठे ता . पारोळा येथील फरशी पुलाच्या याच अस्वस्थतेमुळे पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. काल रात्री ६ वाजता झालेल्या पावसामुळे फरशी पूल ओसंडून वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती. सकाळी उशिरापर्यंत पाणी कमी न झाल्याने शाळकरी मुलांना शाळेत न येता माघारी परतावे लागले.
रस्ता उंच फरशीपुल खोल – अमळनेर मुकटी या वाहतूक या मार्गे सुरु यामार्गाने चाळीसगाव, धुळे, पारोळा आदी जाणे सोयीस्कर असून एस टी बस सेवा सुरळीत सुरु आहे. मागील पाच वर्षापासुन रस्ता पूर्णता डांबरीकरण झाला. मात्र याच रस्त्यावरील पिंपळकोठे येथील फरशी पुल रस्त्यापासुन किमान पाच फूट खोल असल्याने थोडासा जरी पाऊस पडला तरी या फरशी पुलावरून पाणी वाहते. यामुळे वाहतूक थांबते. वसंतनगर, भोलाणे या गावामधील अंतर फक्त एक किलोमीटर असून यांचा संपर्क तुटतो. तर वसंतनगर येथे शाळेत येणाऱ्या पिंपळकोठे विध्यार्थ्याना मात्र याचा त्रास सहन करावा लागत असून वाहत्या पाण्यातून पालक जीव मुठीत धरून शाळेत मुलांना सोडतात.
रस्ता डांबरीकरण होऊनही या फरशी पुलाचे काम जैसे थे असल्याने संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम होऊनही फरशी पुलाची उंची न वाढवता तशीच असल्याने त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी असल्याने वाहनधारकाला त्याचा अंदाज येत नाही. लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्ष घालून समस्या सोडवावी अशीही मागणी होत आहे.