Home राजकीय भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका

भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका



अकोला (वृत्तसंस्था) अकोल्याचे भाजपचे विद्यमान खासदार संजय शामराव धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला असून धोत्रे यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून धोत्रे यांचे तिकीट कापण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या तणावातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. विकासकामे रखडल्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचे तिकीट कापणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते. दरम्यान, धोत्रे यांच्यावर अकोल्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे कळते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound