जळगाव (प्रतिनिधी) उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत असते म्हणून या दिवसांमध्ये कोणता ज्यूस घेणे आवश्यक आहे. तो शरीरासाठी खूप आरोग्यदायी व घरगुती साहित्यांपासून तयार होणारे असावे, असा विचार करून शेफ हर्षाली चौधरी यांनी आपल्यासाठी खास ‘वॉटरमेलन फ्रूट पंच’ तयार केले आहे.
टरबूज किंवा कलिंगड हे शरीरासाठी उपयुक्त असून शरीराची उष्णता कमी करण्याचे काम करते. कलिंगड गुणाने अत्यंत शीतल असून उत्तम टॉनिक आहे. हे फळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून येते. सोबत यामध्ये व्हिटामिन ‘ए’ आणि ‘सी’ देखील असतात. वॉटरमेलन वजन कमी करते, यामध्ये कॅलरी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते. टरबुजामध्ये असलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंगसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. टरबुजामध्ये उपलब्ध असलेले एमिनो अँसिड आर्जिनीन शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करते. हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधीतप्रणाली योग्य ठेवते. टरबूजामुळे हाय ब्लडप्रेशरला नियंत्रणात ठेवता येते. यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि एमिनो अँसिड तत्त्व एकत्रितपणे नसांना स्वस्थ आणि मजबूत बनवतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. हे तत्त्व शरीरातील अँसिडचे संतुलन कायम ठेवते. यामुळे उच्च रक्तदाबाची शक्यता कमी होते. लोकांसाठी टरबूज हा रामबाण उपाय आहे. दररोज एक ग्लास टरबुजाचा ज्यूस प्याल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या नियंत्रणात येऊ शकते. अशा या आरोग्यदायी टरबुजापासून ज्यूस कसे तयार केले जाते ते पाहूया शेख हर्षाली चौधरी आणि प्रतिमा पाटील यांच्याकडून.
वॉटरमेलन फ्रूट पंचसाठी लागणारे साहित्य । वॉटरमेलन ज्यूस, डाळिंबाचे ज्यूस, खडीसाखर, बर्फाचे तुकडे, जिरा पावडर, जल-जीरा पावडर आणि सब्जा सीड.
अशाचप्रकारे अन्य पाककृतीचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट दया.