जळगाव (प्रतिनिधी) एकदा मी सहज माझ्या गार्डनमध्ये फिरत असताना, खूप सारे गावरान गुलाब फुललेले दिसले. या फुलांपासून काय बनवावे, तर या गावरान गुलाबांपासून हेल्दी शेक तयार करावा, असा विचार माझ्या मनात आला. मग गुलाबाच्या पाकळयांपासून रोज़शेक तयार केले. अशी माहिती शेफ हर्षाली चौधरी यांनी सांगितली.
हा रोज़शेक कसा बनला आहे, हे चेक करण्यासाठी त्यांनी तो शेक घरातील लोकांना प्यायला दिला आणि गंमत काय झाली. रोज़शेक घरातील सर्वच लोकांना खूप आवडला. पण याचे नामकरण काय करायचे असा विचार सर्वांचा मनात आला, मग घरातील सर्वांनी मिळून याचे नाव ठेवले ‘रोज़क्वीन’. हे ‘रोज़क्वीन’ पेय शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करते. तसेच ते चेहरावर तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठीही उपयुक्त असते. या गुलाबाचे आरोग्याशीही जवळचे नाते आहे. इंग्रजीमध्ये ‘पिंक हेल्थ’ म्हणजे धडधाकट तब्येत. अशा या गुलाबाची महती केवळ साहित्यानेच नव्हे, तर वैद्यकीय शास्त्रानेही मान्य केली आहे. ‘रोज़क्वीन’ पेय बनवण्यासाठी लागणारे साहित्य असे आहे.
साहित्य । चिल्ड मिल्क, शुगर सिरप, बर्फाचे तुकडे, रोज इमल्शन, गुलाबाच्या पाकळ्या आणि आइस्क्रीम.
अशाचप्रकारे पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी दररोज ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’च्या संपर्कात रहा.