सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जेष्ठ नागरीकांसाठी लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत तालुका वैधकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड-१९ लसीकरणासाठी सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज असून उद्यापासून ग्रामीण भागात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात जेष्ट नागरीक कोमॉरबीड (गंभीर आजार असलेले) अशा नागरिकांना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम सुरू होत असल्याची माहिती डॉ. नसीमा तडवी वैद्यकीय अधिकारी सावखेडासिम यांनी दिली.

संपुर्ण देशासमोर कोरोना संसर्गाच्या महामारीचे संकट उभे असून यावर मात करण्यासाठी देश व महाराष्ट्रासह जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन लसीकरणास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर , फ्रन्टलाइन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. या नंतर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १मार्च पासून शहरी भागात सुरुवात झालेली आहे. तर दिनांक ८ मार्च पासून ग्रामीण भागात प्राथमिकआरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणाला सुरुवात होत आहे. यात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉरबीड (गंभीर आजार असलेले) नागरिक यांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान नागरीकांनी लस घेण्याअगोदर जेवण करून येणे गरजेचे आहे. 

डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी व आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम व कार्यक्षेत्रातील उपकेंद्र दहिगाव , मोहराळा , कोळवद , सातोद व जामन्या येथे लसीकरण सत्राचे नियोजन करून पथक तयार करण्यात आलेले आहेत.

 

Protected Content