जळगाव प्रतिनिधी । शहरातील न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात आज (दि.5) रोजी रोटरी क्लब ७ बाय ७ बाय ७ अंतर्गत ‘आरोग्य’ याविषयावर डॉ.शशिकांत गाजरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते डॉ.शशिकांत गाजरे यांचे पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ.शशिकांत गाजरे यांनी योग्य जीवन शैली, संतुलित आहार, व्यायामाचे महत्व, आजाराचे प्रकार व त्यापासून कशी काळजी घ्यावी अशा अनेक आरोग्यविषयक प्रश्नमंजुशा द्वारे विद्यार्थाना माहिती दिली. तसेच यावेळी योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थाना ‘अग्निपंख’ हे पुस्तक बक्षिस म्हणून देण्यात आले. डॉ. गाजरे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी व निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली देऊन विद्यार्थाना हसत-खेळत मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षक किशोर पाटील, लता इखनकर, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलजा चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी केले.
पहा : आरोग्यविषयक डॉ. गाजरे यांनी काय सांगितले.