यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२=२३ साठी प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील होते. यावेळी प्रथम वर्ष कला,वाणिज्य व विज्ञान वर्गातील 348 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली निकुंभ व फार्मसीस्ट श्री. उमेश येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील आय. सी. टी. सी. विभागामार्फत किशोरवयीन विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी व रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यावेळी कौन्सिलर वसंत कुमार संदानशिव, लॅब टेक्निशियन रवी माळी, लॅब वर्कर पवन जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा एम. डी. खैरनार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस पी कापडे, डॉ. सुधा खराटे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. आर. डी. पवार डॉ. एच. जी भंगाळे, डॉ. पी.व्ही. पावरा उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एम. पी. मोरे, सि. टी. वसावे, नरेंद्र पाटील, संतोष ठाकूर, डी. डी. पाटील, प्रमोद भोईटे यांनी सहकार्य केले.