जळगाव, प्रतिनिधी | आज मनपा शाळा क्र. ४८ येथे महिला व बालकल्याण विभागाद्वारे बालक दिन साजरा करण्यात आला. यात मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
मनपा शाळा क्र. ४८ येथे बालक दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीप्रसंगी महापौर सीमा भोळे, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, उपायुक्त अजित मुठे, बालरोग तज्ञ मलिंद बारी दंतवैद्य ठाकरे उपस्थित होते. नगरसेविका हसिनाबी शेख, प्रतिभा कापसे, पार्वताबाई भिल, नगरसेवक मयूर कापसे, कुलभूषण पाटील, सुरेश सोनवणे, अतुल बारी, महिला बालकल्याण अधीक्षक पांडूरंग पाटील, शाळा क्र. ४८ चे मुख्याध्यापक गंगाराम फेगडे व शाळा क्र. ३५ चे मुख्याध्यापक ईकबाल तडवी, शाळेतील शिक्षक व महिला बालकल्याण विभागाकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. मिलिंद बारी, डॉ. श्री. पी. ठाकरे यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली. यावेळी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी यांनी मुलांना खाऊचे वाटप केले. सूत्रसंचालन तनुजा पाटील यांनी तर आभार कविता पाटील यांनी मानले.