अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | २६ जुलै रोजी ॲड.ललिता पाटील यांच्या मार्फत मारवड येथे महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.मारवड बोरगाव गोवर्धन येथील महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला व गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख ॲड.ललिता पाटील भिकन पाटील वसुंधरा लांडगे डॉ प्रतिभा मराठे निताताई शिरसाठ प्रा.आशिष शर्मा भारतीताई पाटील रेणू प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती शिबीरात ज्ञानेश्वरी पाटील, सुष्मा वाघ, अर्चना शिसोदे, मुरलीधर बिरारी व गणेश लॅबचे अमोल शहा यांचे अनमोल सहकार्य लाभले.
३०० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. यापैकी १६ महिलांचे एबी कमी निघाले. या १६ महिलांना पुढील प्रथमोपचार विनामुल्य देण्यात येत आहे. शिबीरास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला ॲड. ललिता पाटील यांचे सर्व महिलानी आभार मानले.