यावल (प्रतिनिधी): तालुक्यातील दहीगाव येथील सार्वजनिक श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचा यात्रोत्सव मोठ्या उत्सहात पार पडला. या यात्रोत्सवात जळगाव जिल्ह्यासह तालुक्यातील आमोदा, गाढोदा, बोराडे, चुंचाळे, शिरसाड, साकळी येथील शेकडो महिला आणि पुरुष भक्तमंडळींनी भव्य दिंडी दाखल झाल्या होत्या. यावेळी यात्रेनिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडीत सहभागी भाविकांनी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात भारुड भजन भक्ती गीते गाऊन संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार केले दिंडी सोहळ्याचे स्वागत विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील, हेमराज महाजन तसेच हरिभक्त मंडळी दहिगाव यांनी केले. सकाळी ५ वाजता मंदीरात विठ्ठल रुक्मिणी ची पूजा गावातील नवविवाहित बारा जोडप्यांनी केली. यात्रोत्सवातच्या निमित्ताने उत्सव कमेटीच्या माध्यमातुन उत्कृष्ठ सामाजीक उपक्रम म्हणून जळगाव येथील माधवराव गोळवलकर सेवा रक्तपेढी यांच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. याशिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच चोपडा येथील डॉ. चंद्रकांत बारेला यांनी सर्वरोग निदान शिबिर आयोजीत केले होते. आज रुग्णांची तपासणी केली यात परिसरातील सुमारे ४०० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. सर्व रुग्णांना डॉक्टरांमार्फत मोफत औषधेही वितरीत करण्यात आली. फराळ वाटपासाठी व व यात्रोत्सवासाठी मयुर पाटील, अरुण पाटील, कोमल पाटील, प्रवीण बडगुजर, प्रकाश कोळी आदींनी सहकार्य केले. यात्रोत्सव शांतेत पार पडावे यासाठी पोलीस बंदोबस्तात सहाय्यक फौजदार वंजारी नेताजी यांनी चोख पार पाडला.