Home आरोग्य विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे आरोग्य शिबीर उत्साहात

विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे आरोग्य शिबीर उत्साहात

0
27

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जि. प. सदस्य मधुकर काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या भव्य आरोग्य शिबिराचा तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरास सेवा देणारे डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. जितेश पाटील, डॉ. सोहेल सर, डॉ. एल. टी. पाटील, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र बापू पाटील, आशासेविका, अंगणवाडी सेविका तसेच शिंदाड गावातील व परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. या शिबिराचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 


Protected Content

Play sound