जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषदेतील शिक्षण माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना संच मान्यता वाटप शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी शिपाई वगळून कर्मचाऱ्यांच्या संचमान्यता वाटप शिबिर १ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. शिबिरास स्वतः मुख्याध्यापकांनी हजर राहावे प्रतिनिधी पाठवू नये तसेच माध्यमिक संलग्न उच्च माध्यमिक शाळांच्या सर्वमान्यता अद्याप प्राप्त झालेला नाही तरी ५ ते १० वीपर्यंतच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भास्कर पाटील यांनी केले आहे. हे शिबिर अॅड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालय खाजामिया रोड जळगाव येथे ११ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे यात जळगाव शहर जळगाव ग्रामीण भुसावळ रावेर यावल चाळीसगाव अमळनेर मुक्ताईनगर पारोळा भडगाव पाचोरा बोदवड धरणगाव जामनेर चोपडा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.