

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैसे मोजून देतो असे सांगून एका सेल्समन व्यक्तीची फसवणूक करून त्यांच्याजवळील १३ हजारांची रोकड चोरून नेले. हा प्रकार शहरातील एसबीआय बँकेजवळ २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सतिष दशरथ चौधरी वय ५७ रा. मयुर कॉलनी, जळगाव हे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत आले होते. त्यावेळी त्यांनी एटीएममधून पैसे काढले. त्याठिकाणी दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी पैसे मोजून देतो असे सांगून हातचालाखी करून त्यांच्याजवळील १३ हजारांची रोकड लंपास केले. हा प्रकार घडल्यानंतर सतिष चौधरी यांनी शनीवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.



