Home Cities अमळनेर अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग !

अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून अंगावर ओढून विनयभंग केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी १८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १९ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असतांना गावात राहणारा संशयित आरोपी दिनेश दत्तू गायकवाड याने पिडीत मुलीचा हात पकडला. त्यानंतर तिला अंगावर ओढण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. यावेळी संशयित आरोपी दिनेश गायकवाड याच्या सोबत एक अनोळखी व्यक्तीने त्याला प्रोत्साहित केले. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने नातेवाईकांसह मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी दिनेश गायकवाड आणि त्याच्या सोबत असलेला अनोळखी व्यक्त या दोघांवर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound