शेंगोळा येथील किराणा दुकान फोडून रोकड लांबविली

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील किरणा दुकान फोडून १ लाख ३० हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, निवृत्ती पंढरी दोड (वय-३९) रा. शेंगोळा ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. ३ जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याने त्याचे दुकान बंद करून घरी गेला. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानाच्या ड्रव्हरमध्ये ठेवलेले १ लाख ३० हजार रूपये चोरून नेले. हा प्रकार ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. त्यांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.

Protected Content