हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले : काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

 

यंदा जून महिना उलटून गेल्यानंतर देखील समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून मात्र पाऊस सुरू झालेला आहे. यात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झालेला आहे. तर मुख्य उपनदी असलेल्या पूर्णातही मोठा जलसाठा असल्याने हतनूरमधील जलसाठ्यात वाढ झालेली आहे. यामुळे परवा पासून हतनूरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पहिल्यांदा चार दरवाजे उघडण्यात आले होते.

 

दरम्यान, पावसाचे प्रमाण वाढतच असल्याचे आता हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे नदापात्रात मोठ्या प्रमाणात जल विसर्ज होऊ लागला आहे. यामुळे खालील बाजूस असलेल्या नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव पाटबंधारे विभागातर्फे याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे.

Protected Content