मुक्ताईनगर/बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल हटकर पाटील समाज बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित समस्त हटकर पाटील समाजाचा भव्य वधुवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जवळजवळ २ हजारहून अधिक समाज बांधव सदर मेळाव्यास एकवटला होता. या मेळाव्यामध्ये जवळपास १३५ मुला मुलींनी आपला परिचय सादर केला.
समाजातील उपवर – वधुंचे विवाह जोडण्यासाठी एकमेकांची ओळख व परिचय होणे आवश्यक असून अश्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पसंतीच्या वर – वधुंची निवड करणे सोयीचे जाते. त्यामुळे वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन शिरसाळा मारुती देवस्थान तालुका बोदवड येथे आयोजन केले होते.प्रत्येक आई – वडिलांना वाटते की आपल्या मला मुलींना चांगले वधू वर मिळायला हवे अश्या वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून योग्य स्थळ शोधण्यात मदत होते व इतर योग्य स्थळासाठी इतर बाहेर फिरण्यासाठी लागणारा पैसा ,वेळ त्रास कमी होतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वनाथ पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन हटकर पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष त्र्यंबक नप्ते, उपाध्यक्ष शिरीष पाटील,सचिव गणेश शिंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप्रज्वलन तसेच हनुमंत राया, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी 135 उपवर – वधुंनी आपले परिचय पत्र वाचून दाखवले मेळाव्याला मराठावाडा, खान्देश, विदर्भातून जवळ जवळ ३०० कि.मी.वरून ११७ गावातून उप वर व पालकांनी उपस्थिती दर्शवून उत्कृष्ट नियोजनबाबत आयोजकांचे स्तुती केली कार्यक्रम झाल्यानंतर लगेच जेवणाची व्यवस्था हिंगणे येथील सरपंच रामराव पाटील यांनी केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के.पाटील, गजानन गव्हारे, प्रशांत पाटील तर प्रास्तविक श्रीकृष्ण पाटील ग्रामसेवक व मनोगत डॉ शरद काळे, राजेंद्र नरोटे यांनी केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय पाटील, राजेंद्र पाटील हे लाभले आभार प्रदर्शन चंदन पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष पाटील, प्रभाकर पाटील,भरत गव्हारे, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश पाटील,अमरदिप पाटील, किरण पाटील, पुंजाजी पाटील,गजानन नेवडे,सुखदेव नरोटे, सुभाष जेठर, वामन देवकर, बंडू पाटील, जितू पाटील, प्रवीण पाटील,योगेश पाटील,उमेश पाटील, अनिल पाटील, विजय पाटील, जितू शिंदे, गणेश नप्तें, ज्ञानेश्वर पाटील, रमेश पाटील, जे.ए.पाटील, अविनाश के. पाटील, अजय हटकर आदींनी परिश्रम घेतले.