Home Cities मुक्ताईनगर शाळेत SIT दाखल झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम? संस्थाचालकांनी केले खंडन

शाळेत SIT दाखल झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम? संस्थाचालकांनी केले खंडन

0
4


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुऱ्हा काकोडा येथील स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालयात SIT पथक दाखल झाल्याच्या वृत्तानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थाचालकांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले असून, शाळेत कोणतेही SIT पथक दाखल झाले नसल्याचा दावा केला आहे.

संस्थाचालकांनी सांगितले की, शाळेत SIT पथक आल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून, प्रत्यक्षात त्यांच्या शाळेत असे कोणतेही तपास पथक दाखल झालेले नाही. “हे सर्व खोटे विषय असून आमच्या शाळेमध्ये असे कुठलेही तपास पथक दाखल झालेले नाही. विनाकारण आमच्या शाळेची आणि संस्थेची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

SIT पथक शाळेत दाखल झाल्याच्या वृत्तामुळे संबंधित विद्यालय तसेच संस्थेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, संस्थाचालकांनी या वृत्तावर आपली बाजू स्पष्ट करताना अशा प्रकारची कोणतीही चौकशी किंवा तपास पथक शाळेत आले नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, संस्थाचालकांच्या या खुलाशामुळे SIT पथक नेमके शाळेत दाखल झाले होते की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी संबंधित अधिकृत प्रशासन किंवा तपास यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अधिकृत पातळीवरून नेमकी माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे वास्तव स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संस्थाचालकांनी SIT पथक दाखल झाल्याच्या वृत्ताचे ठामपणे खंडन करत हे वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता स्पष्ट करण्यासाठी अधिकृत प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound