जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्हॉटसॲपवर चॅटींग करून अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत भुसावळ येथील एकाची १० हजार ५८० रूपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयिताला सायबर पोलीसांनी हरीयाणातून अटक केली. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरसलिम आशू मोहम्मद रा. गागडबास मेवात, हरीयाणा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भुसाळ शहरातील रहिवाशी आहे. १८ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हॉटसॲप नंबरवर संशयिताने स्त्री असल्याचे भासवून तक्रारदार यांच्याशी चॅटींग केली. त्यानंतर संशयिताने तक्रारदार यांच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठविला. त्यानंतर तक्रारदार यांचे काही फोटो घेवून स्त्रीसोबत व्हिडीओ बनविला आणि सोशल मिडीयात व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी घाबरून दिलेल्या बँक अकाऊंटवर १० हजार ५८० रूपये पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी १९ एप्रिल रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलीसांनी तांत्रिक तपासात संशयित आरोपी हा हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. मिलींद जाधव, ललित नारखडे, संदीप नन्नवरे यांनी संशयित आरोपी मुरसलिम आशू मोहम्मद रा. गागडबास मेवात, हरीयाणा याला हरियानातून शुक्रवारी ८ जुलै रोजी अटक केली. याप्रकरणी रविवारी १० जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील १० हजार ५८० रूपयांची रक्कम हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.