जिल्हयातील सर्व मतदारसंघाकरिता खर्च निरीक्षकपदी हरकेश मीना व रोहीत इंदोरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथील भारत निवडणूक आयोग यांच्याद्वारे जळगाव जिल्हयातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगांव शहर आणि जळगांव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघ करीता निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आय.आर.ए.एस हरकेश मीना आणि आय.आर.एस, सी.ॲण्ड सी.ई रोहीत इंदोरा यांची मा.खर्च निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरकेश मीना हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ” सह्याद्री ” विश्रामगृह येथून कामकाज पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 94043 05893 आहे. रोहीत इंदोरा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील “अजिंठा ” विश्रामगृह येथून कामकाज पाहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 94043 05898 आहे.

रोहीत इंदोरा चोपडा, रावेर, भुसावळ, जळगांव शहर आणि जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदार संघातील कामकाज पाहणार आहेत तर हरकेश मीना हे अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर या विधानसभा मतदार संघातील कामकाज पाहणार आहेत.

या सर्व 11 विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांना केवळ निवडणूक संबंधीत कामाकरिता निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत संपर्क करावयाचा असेल त्यांनी दिनांक 22 ऑक्टोबर पासुन रोज दुपारी 04.00 ते 05.00 या वेळेत कार्यालयीन पत्त्यावर अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Protected Content