हरीविठ्ठल नगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, १४ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला आहे. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोठी बहिण हिला काकाच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडली. दुपारपर्यंत घरी न असाल्याने तिच्या परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली तिचा पत्ता लागला नाही. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content