मुसळधार पावसामुळे सातपुडा परिसरातील हरिपुरा, वड्री व मोर धरण ओव्हरफ्लो

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊसांची रिपरीप सुरू आहे. यावल तालुक्यात झालेल्या दमदार पाऊसामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धरण हे ओव्हरफ्लो झाली आहे. यावल तालुक्यात यावल शहर (३७.१ मिली मीटर), फैजपुर (५४ .०० मिली मीटर), भालोद (५३.०० मिली मीटर), बामणोद (५८.३ मिली मीटर), साकळी (३७.६ मिली मीटर) तर किनगाव (२७.६ मिली मीटर) एकुण २६७ .६ मिली मीटर अशी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

शेतकरी बांधव या पावसामुळे आनंदीत दिसून येत असून यावल तालुक्यातील मध्य प्रकल्प म्हणुन ओळखले जाणारे हरिपुरा धरण व वड्री धरण ऑव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या स्टेप (पायऱ्यावरून) पाणी ओसांडून वाहत आहे. या ठिकाणी येणाऱ्या व परिसरातील राहणाऱ्या नागरीकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या मोर धरण, वड्री धरण व हरिपुरा धरण हे दोन दिवसांपासुन होत असलेल्या दमदार पाऊसामुळे धरणे ओव्हरफ्लो झाली असल्याने या परिसरातील हडकाई खडकाई व भोनक नदीला काही प्रमाणात तर मोर नदीला पुराचे पाणी दुथडी भरून वाहू लागले आहे. यावेळी येणाऱ्या काही तासात पाऊसाचा वेग वाढणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आले आहे. तालुक्यातील नदी काठावरील गावांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content