फैजपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आमदार हरिभाऊ जावळे यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज स्वच्छता आणि पेयजल मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली.
पुणे येथे पदभार स्वीकारल्यानंतर आमदार हरिभाऊ जावळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यालय उभारण्या बाबत चर्चा झाली. जेणेकरून या कार्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठानी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांनी केलेले कृषी संशोधन उद्योजांकन मार्फत उत्पादित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यानपर्यंत पोहचवणे शक्य होईल.
कृषी विभागाच्या माध्यमातून जे संशोधन होत आहे. ते संशोधन, नवनवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यान पर्यंत आणि शेती पर्यंत (Lab to Land) पोहाचण गरजेच आहे.या संधर्भात या वेळी चर्चा झाली.कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि शोध आणि सद्याची परिस्थती यावर यावेळी चर्चा झाली.