कर्ज फेडण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हेवाडा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी नाशिक येथे २५ लाखांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कोल्हेवाडा येथील माहेर असलेल्या तेजस्विनी युगंधर चौधरी वय-२७ यांचा विवाह नाशिक येथील युगंधर सुधाकर चौधरी यांच्याशी जुलै २०२२ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. काही महिन्यानंतर विवाहितेला बँकेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी माहेराकडून २५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, याचा राग येऊन पती युगंधर चौधरी याने विवाहितेला शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सासू, सासरे, माम सासू आणि माम सासरे यांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी कोल्हेवाडा येथे निघून आल्या. दरम्यान त्यांनी बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती युगंधर सुधाकर चौधरी, सासु ज्योती सुधाकर चौधरी, सासरे सुधाकर रामदास चौधरी तिघे रा. नाशिक, माम सासू जयश्री सुनील चौधरी आणि माम सासरे सुनील मनोहर चौधरी दोन्ही रा. फैजपूर यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहे.

Protected Content