जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून शिवाजी नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बुधवारी १९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील माहीर असलेल्या सायमा शोएब खाटीक (वय-२६) यांचा विवाह बीड येथील शोएब जाकीर खाटीक यांच्याशी झाला. दरम्यान लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पती शोएब खाटीक याने पत्नी सायमा खाटीक यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासू, सासरे यांनी देखील टोमणे मारून छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी शिवाजीनगर जळगाव येथे निघून आल्या. बुधवारी १९ जुलै रोजी विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शोएब जाकीर खाटीक, अकीलाबी जाकीर खाटीक, जाकिर निर्माण खाटीक सर्व रा. बीड यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहे.