जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पतीच्या नोकरीसाठी खासगी संस्थेत पाच लाख भरायचे असल्याने ते माहेरुन आणावे म्हणून जळगाव तालुक्यातील धानोरा येथील माहेर असलेल्या सुजाता दीपक लहारे (२९) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. या प्रकरणी सोमवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सासरच्या पाच जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानोरा येथील माहेर असलेल्या सुजाता यांचा विवाह अमळनेर येथील दीपक लहारे यांच्याशी झाला होता. दीपक यांना खासगी संस्थेत नोकरीसाठी ५ लाख रुपये भरायचे होते. ती रक्कम विवाहितेने तिच्या माहेरुन आणावी, अशी मागणी तिच्याकडे केली जाऊ लागली. त्यासाठी तिला वारंवार शिवीगाळ करणे, मारहाण करीत दमदाटी करण्यात येत होती. वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून सुजाता या माहेरी निघून आल्या.
या प्रकरणी त्यांनी सोमवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विवाहितेचे पती दीपक पांडुरंग लहारे, सासरे पांडुरंग लहारे, सासू अंजना लहारे, जेठ सुनील लहारे, जेठाणी उज्ज्वला लहारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील करीत आहेत.