जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील जोशी कॉलनी येथे माहेर असलेल्या विवाहितेला कर्ज फेडण्यासाठी बाहेरून २ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात एक फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक अशी की, जळगाव शहरातील जोशी कॉलनी येथील माहेर असलेल्या प्रगती चेतन ओतरी (वय-२२), यांचा विवाह एमआयडीसीतील चेतन अशोक ओतारी यांच्याशी रितीरिवाजा नुसार झालेला आहे. दरम्यान विवाहितेने कर्ज फेडण्यासाठी बाहेरून २ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला तसेच त्रास दिला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी जोशी कॉलनी येथे निघून आल्या. दरम्यान त्यांनी गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती चेतन अशोक ओतारी, सासू रेखा अशोक ओतारी, सासरे अशोक रघुनाथ ओतारी आणि जेट मनोज अशोक ओतारी सर्व राहणार एमआयडीसी जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.