Home क्राईम हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ

हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ

0
34

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हरी विठ्ठल नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला हुंड्याच्या पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना जगदीश भोई (वय-३०) रा. हरीविठ्ठल नगर यांचा विवाह जुने जळगावातील जगदीश सुकलाल भोई यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान विवाहितेला हुड्यांच्या पैशांची मागणी केली, दरम्यान विवाहितेने पैसे न आणल्यामुळे पती जगदीश भोई याने शिवीगाळ करून मानसिक छळ केला. तसेच सासरच्या मंडळींनी देखील पैश्यांचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून विवाहिता सपना भोई या माहेरी हरीविठ्ठल नगर येथे निघून आल्या. या संदर्भात बुधवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती जगदीश सुकलाल भोई, सासू धोंडाबाई सुकलाल भोई, सासरे सुकलाल भिका भोई, जेठ राजू सुकलाल भोई, जेठाणी वैशाली राजू भोई, सोनी बापू भोई आणि बापू भोई सर्व राहणार कोळीपेठ, जुने जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound