भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी बोदवड येथे घरातील कौटुंबिक कारणावरून शिवीगाळ करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात शुक्रवारी रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील माहेर असलेल्या कांचन अतुल बऱ्हाटे वय 33 यांचा विवाह बोदवड येथील अतुल निनाजी बऱ्हाटे यांच्याशी झालेला आहे. दरम्यान लग्नाच्या सुरुवातीचे दिवसानंतर त्यांना कौटुंबिक आणि किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे, मारहाण करणे असा छळ सुरू झाला. त्यानंतर सासू, मावस जेट, जेठांनी, माम सासरे यांनी वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करून छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहित अखेर माहेरी निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अतुल निनाजी बऱ्हाटे, सासू निर्मला निनाजी बऱ्हाटे, मावस जेट राजेंद्र भिका टोके, मावस जेठाणी मंगला राजेंद्र टोके, माम सासरे अनिल रामचंद्र वराडे सर्व रा. बोदवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाखा कुमार मोरे करीत आहे..