यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नागादेवी येथील विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, “यावल तालुक्यातील नागादेवी येथे विवाहिता ह्या आपले पती व कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सोमवार, दि. ६ जून रोजी ९ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असताना गावातील संशयित आरोपी गुड्या भायला मानकर हा दारू पिऊन घरी आला. ‘तुझे पती घरी आहे का?” असे बोलून घरात घुसून विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. या विवाहितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, असता तिचे तोंड दाबून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
दरम्यान, विवाहितेने पतीसह यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गुड्या भायला मानकर यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.