अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात गावात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३८ वर्षीय आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. या गावात राहणारा दुलीचंद धनसिंग पाटील याने महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो पिडीत महिलेच्या मोबाईलवर पाठविले. त्यानंतर अश्लिल हावभाव करून तिचा विनयभंग केला. तसेच त्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. यासाठी गावातील एका महिलेचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान हा प्रकार २१ फेब्रुवारी ते ३ मार्च च्या कालावधीत झाला आहे. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी दुलीचंद पाटील आणि एका महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक केदार बोरवले हे करीत आहे.