पैशांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील इदगाह कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी उत्तरप्रदेश येथे पन्नास हजारांसाठी मारहाण करत छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील इदगाह कॉलनी येथील माहेर असलेल्या अक्सा आफरीन शेख याकुब वय ३० यांचा विवाह उत्तर प्रदेशातील ईरशाद खान फतेह खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. दरम्यान विवाहितेने माहेरहून ५० हजार रूपये आणावे अशी मागणी केली. त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही. या रागातून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, नणंद, जेठ यांच्यासह सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला.

या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून इरशाद खान फतेह खान, सासू रेहानबानो फतेह खान, नणंद अर्शाीबाने फतेह खान, जेठ शमशाद खान फतेह खान, मावस सासू रफत खान सर्व रा. उत्तर प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कांतीलाल केदारे हे करीत आहे.

Protected Content