पैशांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सिल्क मिल्क कॉलनी परिसरातील विवाहितेला पैशांची मागणी करून शिवीगाळ व मारहाण करत छळ केल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील सिल्क मिल्क कॉलनी परिसरात शुभांगी प्रसाद जोशी या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. विवाहिता सासरी नांदत असतांना पती प्रसाद जोशी याने पैशांची मागणी करत तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासू, नणंद, यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत त्यांनी शनिवारी ४ मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजात बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती प्रसाद प्रकाशराव जोशी, सासू शुभदा जोशी आणि नणंद नम्रता प्रकाश राव जोशी सर्व रा. सिल्म मिल्क कॉलनी, भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान पाटील हे करीत आहे.

Protected Content