भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नहाटा कॉलेज परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकरणी सोमवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता तक्रार देण्यात आली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील नहाटा कॉलेज परिसरातील माहेर असलेल्या स्वाती हर्षल चौधरी यांचा विवाह मध्यप्रदेशातील इंदौर येथील हर्षल मधुकर चौधरी यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर विवाहितला लहान लहान गोष्टींवरून टोमणे मारणे सुरू झाले. त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, सासरे, जेठ आणि जेठाणी यांनी देखील शारीरीक व मानसिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर सोमवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पतीस हर्षल मधुकर चौधरी, सासू माधूरी मधुकर चौधरी, सासरे मधुकर आत्मारात चौधरी, जेठ मनोज मधूकर चौधरी आणि जेठाणी नंदीनी मनोज चौधरी सर्व रा. इंदौर मध्यप्रदेश यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल सुमन राठोड करीत आहे