जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी वडाळी येथे १ लाखांची मागणी करत मारहाण व शिवीगाळ करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील माहेर असलेल्या दिपाली युवराज धनगर वय-३३ यांचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातील वडाळी येथील युवराज पंडित धनगर यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला दवाखान्यासाठी लागलेला खर्चासाठी माहेराहून १ लाख रुपये आणावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आले नाही याचा राग मनात धरून पती युवराज धनगर याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासरे, सासू, ननंद आणि भाची यांनी देखील पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती युवराज पंडित धनगर, सासरे पंडित बुधा धनगर, सासूबाई पंडित धनगर, तिघे रा. वडाळी ता.जि. नंदुरबार, नणंद संगीता दीपक धनगर आणि भाची निकिता दीपक धनगर दोघे रा. मुंबई यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश कांबळे करीत आहे.