Home Cities अमळनेर पाच लाखांसाठी विवाहितेचा मारहाण करत छळ

पाच लाखांसाठी विवाहितेचा मारहाण करत छळ


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सडावण येथील माहेरवाशीनीला सासरी भोंडण तांडा येथे शिवीगाळ व मारहाण करत छळ करत ५ लाखांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सडावण येथील माहेर असलेल्या आशाबाई विनोद राठोड वय ३२ याचा विवाह पारोळा तालुक्यातील भोंडण तांडा येथील विनोद चत्रु राठोड यांच्याशी झालेला आहे. लग्नाच्या १० वर्षानंतर विवाहितेला माहेरावून ५ लाखांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, सासरे यांनी देखील पैशांसाठी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी सडावण येथे निघून आल्या. दरम्यान, विवाहितेने सोमवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती विनोद चत्रु राठोड, सासरे चत्रु गरमक राठोड, सासू जयश्री चत्रु राठोड सर्व रा. भोंडण तांडा ता. पारोळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.


Protected Content

Play sound