जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येवून सामूहिक नमाज पठण करण्यात आले. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना तर अक्षय तृतीयेच्या हिंदू बांधवाना शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेता डॉ. प्रशांत बोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, शेतकरी संघ संचालक रमेश नाईक, नगरसेवक बाबुराव हिवराळे, अतिष झाल्टे, उल्हास पाटील, कैलास नरवाडे, अनिस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
माजी मंत्री तथा जामनेर गिरीश महाजन यांनी यावेळी मुस्लिम समाजाला ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर हिंदू समाजाचा असलेल्या अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा देऊन जामनेर सह जिल्ह्यातील नागरिकांनी सर्व सण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जातीय सलोखा राखून शांततेत साजरे करावे त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आव्हान शुभेच्छा देताना आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे