Home Cities पारोळा शिक्षक नेते हणमंतराव पवार कालवश

शिक्षक नेते हणमंतराव पवार कालवश

0
66

पारोळा प्रतिनिधी । शिक्षक नेते हणमंतराव माधवराव पवार यांचे आज सकाळी निधन झाल्याने शिक्षण व सहकारातील एक मातब्बर व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

हणमंतराव पवार (वय ७६) हे मूळचे तामसवाडी (ता. पारोळा) येथील रहिवासी होते. शिक्षक पेशापासून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ करणार्‍या हणमंतराव पवार यांनी शिक्षकांचे नेते म्हणून ख्याती अर्जित केली होती. शिक्षक संघाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरूवात केली. कार्यकुशलतेमुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली. शिक्षक संघाच्या माध्यमातून हणमंतराव पवार यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्‍न सोडवले. शिक्षणासह सहकार क्षेत्रावरही त्यांनी आपल्या कार्याची मोहर उमटवली. ग.स.सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सहकारात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या निधनामुळे शिक्षण आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound