Home क्राईम अखेर ‘त्या’ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अखेर ‘त्या’ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


death

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील 40 वर्षीय महिलेने रविवारी घरघुती किरकोळ कारणावरून घरात गळफास घेतला होता. तिला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन करून मृतहेद नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत ग्रामीण पोलीसात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मिराबाई प्रेमसिंग बारेला (वय-40) रा. कानळदा ता. जळगाव यांनी घरातील किरकोळ कारणावरून घरातील छताला गळफास घेण्याचा प्रयत्न रविवार 28 एप्रिल रोजी केला होता. त्यावेळी मोठी सुनेच्या लक्षात आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर घरातील नातेवाईकांनी आणि शेजारच्यानी खाली उतरवत तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार घेत असतांना सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, पती, सुना असा परीवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound