जळगाव प्रतिनिधी । कांचन नगरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणांने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलीसांकडून माहिती अशी की, प्रशांत नारायण डाबोरे (वय-21) रा. गुरूनानक नगर, शनी पेठ यासह भाऊ आणि आई यांनी 16 रोजी रात्री 10.30 पर्यंत जेवण करून झोपले. भाऊ आणि आई गाढ झोपेत असतांना मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भावाच्या लक्षात आल्याने उघडकीस आले. अत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास रघूनाथ महाजन करीत आहे.