जळगाव प्रतिनिधी । पाचवी इयत्तेत शिकत असलेल्या लहान भावाला बिर्याणी घेण्यासाठी बाहेर पाठवून 19 वर्षीय तरूणाने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून याबाबत धरणगाव पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, बांभोरी येथे चावदस दगडू बाविस्कर हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह करतात. याकामी त्यांना पत्नीही मदत करते. बांभोरी येथेरविवारी नेहमीप्रमाणे सर्व कुटुंब कामासाठी घराबाहेर गेले होते. घरी मोठा मुलगा निलेश चावदस बाविस्कर (वय-19) व लहान मुलगा हेमंत हे दोघेच होते. काही दिवसांपूर्वी निलेश हा केबीएस्क या कंपनीत कामाला होता. मात्र एक वर्षानंतर त्याला ब्रेक मिळाला असल्याने तो घरीच होता.
रविवारी दुपारी नीलेश हा चौकात मित्रांसोबत गप्पा करत होता. नंतर दुपारी नीलेश घरी आला असता त्याने भाऊ हेमंत याला बिर्याणी घेण्यासाठी बस स्टॅन्डवर पाठविले\ काही वेळात हेमंत हा बिर्याणी घेऊन आला तेव्हा त्याने घराचा दरवाजा ढकलला असता नीलेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने आरडाओरड केल्याने शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तत्काळ नीलेश यास जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषीत केले. नीलेश याच्या पश्चात आई वडिल, एक भाऊ तसेच दोन बहिणी असा परिवार आहे. आज सकाळी त्याने त्याचे मामा रवींद्र कोळी यांच्याशी कौटुंबिक बोलणे झाले होते. तो आत्महत्या करेल अशी पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती. त्याचे आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.