पाचोरा प्रतिनिधी । साकीनाका (मुंबई) येथे गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या अमानुष घटनेचा महिला सुरक्षा संघटना, शाखा रावेर यांचेतर्फे निषेध व्यक्त करत या घटनेतील गुन्हेगारा विरूद्ध शासनाकडून फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत सुनावणी होवुन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
आरोपीस फाशी द्या, जेणेकरून यापुढे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासुन महिलांना संरक्षण मिळेल. अशा आषयाचे निवेदन महिला सुरक्षा संघटनेतर्फे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी पाचोरा तालुका अध्यक्षा सरला पाटील, उपाध्यक्षा वैशाली बोरकर, सचिव वैशाली जडे, पी. आर. ओ. अंजली गवांदे, मिडिया प्रतिनिधी अनुजा तावरे, ललिता पाटील ह्या उपस्थित राहुन निवेदनावर त्यांच्या सह्या आहेत.