अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला ठोकल्या बेड्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या नऊ महिन्यापासून बेपत्ता असलेली रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय मुलगी सापडल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले व याप्रकरणी आरोपीला २१ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय मुलीला २७ सप्टेंबर २०२२ रोजी पळवून नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही मुलगी १९ जुलै २०२३ रोजी सापडली. तिचा बाल कल्याण समितीसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने सांगितले की, अनिस भिकारी तडवी (२०, रा. हिंगोणा, ता. यावल) याने शारीरिक संबंध केले. त्यानुसार २१ जुलै रोजी बाल लैंगिक अधिनियमानुसार कलम वाढविण्यात आले. तसेच संशयिताला अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.

Protected Content