Home Cities जळगाव महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
195

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाबोधी बौद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. समाजाने आपल्या अनेक वर्षांच्या मागण्या पुन्हा एकदा शासनासमोर मांडल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भंते धम्मदीप यांनी दिला आहे. यामुळे महाबोधी बौद्ध विहाराच्या मालकी हक्काचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

१९४९ चा कायदा रद्द करण्याची मागणी
निवेदनात प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी, महाबोधी बौद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे. दुसरी, ॲक्ट १९४९ हा जुना कायदा रद्द करावा, कारण त्यामुळे बौद्ध विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हातातून गेले आहे. आणि तिसरी, या विहाराची व्यवस्थापन कमिटी ही केवळ बौद्ध समाजातील व्यक्तींचीच असावी. या मागण्यांसाठी समाजाने अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. या निवेदनातून शासनावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

जिल्हाध्यक्ष सुनील देहाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
हे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देहाडे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी भंते धम्मदीप, भंते अमर जोती, भंते संघरक्षित, भंते संघ सेवक, सुमित्र अहिरे, चंद्रशेखर अहिरराव, रवींद्र बाविस्कर, रमेश थाटे, नितीन अहिरे यांच्यासह बौद्ध समाजातील अनेक कार्यकर्ते आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound