नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने चालविला हातोडा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून भुसावळ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली होती. याच अनुषंगाने भुसावळ शहरातील महात्मा गांधी पुतळा व कोर्ट परिसरदरमयान अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भुसावळ नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, ऐण सणाच्या काळात हे अतिक्रमण काढण्यात येवू नये अश्या सुचना आमदार संजय सावकारे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले होते. दरम्यान, प्रशासनाने आमदार सावकारे यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष देवून भुसावळ नगरपरिषदचे प्रशासन अधिकारी प्रांत जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी महेश वाघमोडे व त्यांच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील महात्मा गांधी पुतळा ते कोर्ट चौक दरम्यानच्या परिसरातील गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून अतिक्रमण जेसीबी व अन्य वाहनांच्या मदतीने  काढण्यात सुरूवात करण्यात आले आहे. यामुळे शहरातील काही सुशिक्षित बेरोजगार यांच्या तोंडचा घास हिसकावल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे,  ज्यांनी खरोखरच अतिक्रमण केले आहे ते काढले जात असल्यामुळे नागरिकांनी या भूमिकेचे स्वागतही केले आहे. अतिक्रमण केवळ प्रमुख रस्त्यांवरच नाही तर भुसावळ शहरातील अन्य भागातही अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे, ते देखील काढावे अशी मागणी होत आहे.

 

Protected Content