पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तब्बल ११ वर्षांनतर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल पुणे सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय बँचने दिला. या निकालात सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना जन्मठेपची शिक्षा दिली तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. या संपूर्ण निकालाचे हमीद दाभेळकरांनी स्वागत केले आहे.
हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्यामुळे दाभोलकर कुटुंबियाकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण तीन सुटका झालेल्या आरोपीविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ असे विधान माध्यमांशी बोलताना हमीद दाभोलकर यांनी केले आहे.
तीन सुटका झालेल्या आरोपींविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार – हमीद दाभोलकर
8 months ago
No Comments