पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जानवे ता. अमळनेर येथे दि. ५ ऑक्टोबर बुधवार रोजी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. गंगाधर महाराज कुरुंदकर हे अध्यक्षस्थानी होते. सदर बैठकीत जिल्हा कमिटी गठीत करणे बाबत साधक बाधक चर्चा होऊन संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्षपदी ह. भ. प. अनिल महाराज मराठे (पाचोरा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
व निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल केशवराव पाटील, विनायक राऊतराय, श्रीराम बापू पाटील हे उपस्थित होते. निर्भंगापली ग्रंथाचे लेखक संत साहित्याचे गाढेळ अभ्यासक प्रा. शिवाजीराव पाटील (गांधीलीकर) यांनी कीर्तन परंपरा व संत साहित्येच्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या बैठकीचे सूत्रसंचलन रविंद्र पाटील यांनी केले. बेठकीचे प्रास्ताविक विश्वासराव पाटील (अमळनेर) यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन विठ्ठल महाजन (पाचोरा) यांनी मानले.