रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरासह तालुक्यात बर्हाणपूरवरून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी करून विक्री होत असल्याने पोलिसांनी या विक्रेत्यांच्या मुसक्या आवळत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रावेर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा तस्कर मध्य प्रदेशातुन विक्रीसाठी रावेर शहरात गुटखा विक्रीसाठी आणतात.शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये गुटखा विक्रीचे महत्वाचे केंद्र आहे.या परिसरात रहिवास करणारा एक व्यक्ती मध्य प्रदेश येथून गुटखा आणून संपूर्ण परिसराला याचा पुरवठा करत असला तरी कारवाई होत नाही.
रावेर शहरात गुटखा विक्री हा महत्वाचा जटील प्रश्न झाला आहे. बर्हाणपूरवरून रावेर शहरात सकाळी छोटा हत्ती या वाहनाने अवैध गुटखा येत असतो. नंतर तो गुटखा शहरातील एक नामवंत तस्कर गुटखा ताब्यात घेऊन शहरात व परिसरात छोट्या व्यापार्यांना विक्री करत असतो. यामुळे विद्यार्थी पुरुष महीला अनेकांना या बंदी असलेल्या गुटख्याचे व्यसन लागले आहे.रावेर शहरात ही विक्री अनेक वर्षा पासुन सुरु आहे.याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जनतेतुन होत आहेत.