जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत लोकमान्य बाळ गंगाधार टिळक पुण्यतिथी तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची भूमिका साकारून त्यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला. प्रसंगी विविध विषयांवर आधारित वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सूर्यकांत पाटील तसेच भावना पाटील यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.