जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इयत्ता चौथीच्या तीन वर्गांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संकल्प समारंभात ज्या दहा विद्यार्थ्यांची वर्ग मंत्रिमंडळात निवड झाली होती. त्यांची सहविचार सभा पार पडली.
शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी सह्याद्री, सातपुडा, निलगिरी वर्गातील सर्व मंत्र्यांशी वर्गशिस्त परिपाठाचे नियोजन वर्ग सफाई यासंबंधी व त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. चर्चेत चिराग पाटील, रुद्राणी पाटील, अविनाश वांगीकर, श्रीनिधी तागड, चेतन बारी या मंत्रांसह सर्वांनी सहभाग नोंदवत आम्ही एकजुटीने काम करू असं आश्वासन दिलं. शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यावेळी उपस्थित होत्या. वर्ग शिक्षिका कायनात सय्यद, मंगल गोठवाल व स्वाती पाटील यांनी मंत्र्यांना विविध सूचना देत वर्षभर शिस्तीने वर्ग सांभाळा असे सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापिका धनश्री फालक यांची उपस्थिती होती.